माझं जग आहे,
तुझ्या डोळ्यात वसलेलं,
पाहू कसं तुला रड्लेल,
आणि माझं जग बुड्लेलं.
*******
धगधगत्या सुर्याची,
खंत कुणाला कळलीच नाही,
प्रणयाची धुंध रात्र,
वेड्यानं कधी पाहीलीच नाही.
*******
आइच्या पायांजवळ,
स्वर्गलोकीच सुख असत,
म्हणुनतर पानसुध्दा
पडताना गिरक्या घेतं
*******
मला तुला पहायचय,
चांदण पांघरुण घेताना,
तूझ्या चेहरयाची कळी,
श्रूंगाराशीवाय खुलताना.
*******
लोक म्हणतात तुझ्याजवळ,
महालात राह्ण्यालायक गुण आहेत,
म्हणुनच असेल कदाचीत,
झोपडि देण नाकारताहेत.
*******
वाळवंटातल्या माणसान,
हिरवळीच स्वप्न पहायच असत,
पण रणरणत्या उन्हात फ़ीरताना,
सोबत फ़ुलाना न्यायच नसत.
*******
मोत्यांच्या शोधात,
समुद्राकाठी फ़ीरत राहिलो,
शिंपल्यांच सॊंन्दर्य,
पायदळी तुडवत राहिलो.
*******
फ़ुलांपेक्शा काटेच,
जास्त प्रामाणिक असत्तात,
त्यानी दिलेल्या जखमा
आयुश्यभर साथ देतात.
*******
तु जरी रडलीस
मी अश्रु पुसणार नाही
जायचय मला दरयाखोरयातुनं
तेथे तुला नेणार नाही.
*******
Saturday, April 12, 2008
Subscribe to:
Posts (Atom)